आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती......
आज हिंदवी स्वराज्य उभे असेल तर ते फक्त शिवरायांमुळेच.....
त्या वेळी शिवरायांनी स्वराज्याचा अट्टहास केला तो फक्त आपल्यासाठी .....या हिंदू धर्मासाठी.....प्रत्येक मावळ्याला एक हक्कच ठिकाण असाव म्हणून....आपल एक अस्तित्व असाव म्हणून .....
मावळ्यान सोबत वेळी अवेळी स्वारया करून, दुष्मनांचे शीर धडावेगळे करून त्यांनी ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.....
पण आज ज्यांच्यासाठी ह्या स्वराज्याची स्थापना केली गेली तेच एकमेकांच्या जीवावर उठलेत, आणि एकमेकाचा जीव घेऊ बघतायेत....आणि फक्त कशासाठी पैसा आणि सत्तेसाठी.....ह्याचसाठी का शिवरायांनी ह्या स्वराज्याचा अट्टाहास धरला होता....
नुसत आजच्या दिवशी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना वंदन करून दुसर्या दिवशी पासून रोजचेच कर्म न करता आपल्या धर्माप्रती, मानुसाकीप्रती एकमेकांना साहाय्य करून सर्व मिळून पुढे जाऊ अशी प्रतीज्ञा करा....आणि तीच खरी भेट होईल शिवरायांसाठी ......
असो सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा......!!
क्षत्रीयाकुलाधीश प्रतिभावंत धर्मनिरपेक्ष छत्रपती शिवाजी महाराज की जय....!!!
जय शिवाजी....जय भवानी ......!!!
No comments:
Post a Comment